*कोकण Express*
*युवा सेने मार्फत मोफत ई – श्रम कार्ड शिबिर*
*युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना- युवासेना फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ई श्रम कार्ड मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य संजय आग्रे, माजी सभापती संदेश पटेल, संतोष टक्के, सचिन तायशेटे, रंजन नेरुरकर, बबनशेठ पवार, सुंदर पारकर, राजू पावसकर, रमेश भोगटे, आनंद मर्ये, सुहास मोदी, शेखर लिंग्रस, अविनाश सापळे, राजू पटेल, सुभाष सावंत, शहरप्रमुख सुरेश टक्के, श्याम भोवड, बंटी उरणकर, पवन भोगले, सिद्धेश राणे, प्रकाश वाघेरकर,साई भोवड, निलेश भोगले, पिंटू पटेल, राजा शिरोडकर, पत्रकार संजय सावंत, महिला आघाडीच्या माधवी दळवी आदीजण उपस्थित होते.