*कोकण Express*
*दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर*
*राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत*
*दोडामार्ग ः लवू परब*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही, म्हणून दोडामार्ग तालुक्यातील व कुडाळ मधील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पक्षाकडे सोपिवले होते, या राजीनाम्या सदर्भात प्रदेशचे नेते,तसेच जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या निर्देशानुसार दोडामार्ग तालुक्यातील व कुडाळ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले असून त्यांना यापुढे पक्षाच्या संघटनात्मक कामाला जोमाने लागा असे संबोधित केले असून राजकारणात एका पराभवाने कार्यकर्ते वा पक्ष संपत नाही, जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात नगरपंचायत निवडणुका झाल्या त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांनी मन लावून एकसंघ पणाने काम केले होते,पण साम दाम, दंड या प्रयोगात आम्ही कमी पडलो,तरी पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही उमेदवारांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला तर काही जागांवर समसमान मतांमुळे पराभव स्वीकारावा लागला.पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या एका निवडणुकीमुळे नाराज न होता पुन्हा नव्या दमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी एक वज्रमूठ तयार करुया.सघटनेत चढ उतार हे येतच असतात.याचा प्रत्यय आपण २०१४ पूर्वी याच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून दाखवून दिलेला होता.पण मध्यंतरीच्या कालावधीत संघटना अस्थिर का झाली याचे विश्लेषण करत बसण्यापेक्षा आता पासून नव्या दमाने सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करूया.पक्षाला प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे.यापूर्वी जिल्ह्यातील संघटनेत त्रृटी काय राहील्यात व यापुढे त्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी लवकरच प्रदेश नेत्यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला असून यापुढे सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेला ताकद देण्यासाठी खास नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही.
♦️काल संपन्न झालेल्या नगरपंचायतीच्या निकालाची सविस्तर माहिती प्रदेश नेत्यांना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुडाळ व दोडामार्ग येथील पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात येत असल्याचे अमित सामंत यांनी सांगुन यापूढे ज्या ज्या पदावर जे पदाधिकारी पक्षाचे काम करत होते त्या पदाधिकाऱ्यांनी त्याच पदावर राहून आपआपल्या भागात पक्षाचे जोमाने काम करावे.असे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट करून यापुढे वरिष्ठ नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटना बळकटी साठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी वा पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत निवडणुकीत अपयश आले म्हणून खचून न जाता पुढील काळात एकदिलाने पक्षाचे काम करून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी आजपासुन सुरुवात करूया.राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या भागात सुद्धा कमी अधिक प्रमाणात अपयश आलेले आहे.मात्र ते खचून न जाता जसे पून्हा उभारी घेऊन नव्या दमाने सुरुवात करणार.त्याच पद्धतीने आपण संघटनेसाठी वाटचाल करुया.असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्पष्ट केले.