वैभववाडीत स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त अभिवादन

वैभववाडीत स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त अभिवादन

*कोकण Express*

*वैभववाडीत स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त अभिवादन*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

मा. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट, शिवसैनिकांचे दैवत वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज वैभववाडी तालुका शिवसेना कार्यालय येथे संपन्न झाली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वर्गीय ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे..!’ अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी साहेबांना आदरांजली वाहिली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर लोके, माजी बँक संचालक दिगंबर पाटील, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, माजी सभापती रमेश तावडे, जि प सदस्य दिव्या पाचकूडे, शहर प्रमुख व नगरसेवक प्रदीप रावराणे,नगरसेवक रणजित तावडे, सुनील रावराणे, सूर्यकांत डाफळे, ग्रामपंचायत सदस्य विलास पावसकर, गवाणकर, कमलाकर सरवणकर, उपशहर प्रमुख वामन करकोटे, देवानंद पालांडे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!