*कोकण Express*
*यारा फाउंडेशनच्या केक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*यारा फाउंडेशनचे उपक्रम ठरणार फायदेशीर प्रशिक्षणार्थ्यांची प्रतिक्रिया*
*कणकवली : मयुर ठाकूर*
लहानसा का असेना पण आपला काहीतरी व्यवसाय आहे आणि आपण त्याचे मालक आहोत, ही भावना प्रत्येकाला नवी उभारी देणारी असते. म्हणूनच अशा स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी यारा फाऊंडेशन, कणकवली यांच्यामार्फत कणकवली येथे केक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आणि पन्नास टक्के उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराला अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.
सध्याच्या कोरोनाच्या काळात या केक किंवा बेकरी संबंधित व्यवसायातून एक चांगले मिळकतीचे साधन प्राप्त होऊ शकते.यारा फाउंडेशनचे उपक्रम फायदेशीर ठरणार अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यानी प्रशिक्षणावेळी कोकण एक्सप्रेस न्युजला दिली.
यारा फाउंडेशन मार्फत शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही यारा फाउंडेशन कार्यरत आहे
….तर यारा फाउंडेशन संस्था अध्यक्ष विश्वराज विकास सावंत, पत्रकार श्रेयस अरविंद शिंदे, समीर गोपाळ परब, निलम विजय राणे, कोकण एक्सप्रेस पत्रकार मयूर मंगेश ठाकूर, चंद्रशेखर धुरी, गोपाळ लोके ,गार्गी कसालकर, प्राजक्ता कदम यांचे मार्गदर्शन लाभले