*कोकण Express*
*खारेपाटण ग्रामपंचायत आयोजित आधार कार्ड कॅम्प चा नागरिकांनी घेतला लाभ*
*खारेपाटण : प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने खारेपाटण गावातील नागरिकांसाठी आधार कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन नुकतेच ग्राममपंचायत कार्यलयात करण्यात आले होते. या आधार कार्ड कॅम्पचा शुभारंभ खारेपाटण गावचे सरपंच श्री रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सलग दोन दिवस घेण्यात आलेल्या या आधार कार्ड कॅम्पचा खारेपाटण मधील सुमारे १०० पेक्षा अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.
यावेळी खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, रीना ब्रम्हदंडे, सोनल लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.कणकवली तहसील कार्यालयातील आधार सेंटरचे कर्मचारी महेश सुतार व महेश म्हसकर हे यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण गावातील लहान मुले तसेच जेष्ठ नागरिक,महिला वर्ग यांना आधार कार्ड काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो.तसेच बऱ्याच आधार कार्ड धारकांच्या देण्यात आलेल्या आधार कार्ड मध्ये अक्षम्य चुका असल्याने त्याचा मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.त्यामध्ये दुरुस्ती होणे आवश्यक आहे.या सर्व बाबींचा विचार करून खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने हे आधार कार्ड कॅम्प नागरिकांच्या सोयीसाठी घेण्यात आले असल्याचे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.