हळवल-शिरवल– कळसुली मुख्य मार्गावरील मोऱ्यांचा भराव खचला; सां. बा. विभागाचा मात्र झालेल्या कामांकडे लक्ष नाही

हळवल-शिरवल– कळसुली मुख्य मार्गावरील मोऱ्यांचा भराव खचला; सां. बा. विभागाचा मात्र झालेल्या कामांकडे लक्ष नाही

*कोकण Express*

*हळवल-शिरवल– कळसुली मुख्य मार्गावरील मोऱ्यांचा भराव खचला; सां. बा. विभागाचा मात्र झालेल्या कामांकडे लक्ष नाही*

*कोट्यवधी निधी खर्ची घातलेला रस्ता वाहतुकीस धोकादायक*

*आता तरी सां. बा.विभाग याप्रकारकडे लक्ष देईल का?*

*कणकवली : मयुर ठाकूर*

हळवल, शिरवल, कळसुली मुख्य रस्त्यावर मागिल वर्षी कोट्यवधी निधी खर्च केलेला रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मुंबई गोवा हायवेला जोडणारा हळवल, शिरवल, कळसुली रस्ता सा.बां.च्या अत्यारीत आहे. रस्त्यावरील सर्व मोऱ्यांचा भराव पहिल्याच काही महिन्यात खचला असून वाहन चालकांना त्या खचलेल्या भागाचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.

याकडे सां.बा.विभागाचा दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या रस्त्यावरून हळवल, वागदे, कळसुली, शिरवल, शिवडाव, कसवन- तळवडे आंब्रड, कुंदे, घोडगे, जांभवडे, सोनवडे, दारीस्ते, भरणी आदी गावातील शेकडोंच्या संख्येने वाहनचालक कणकवली शहराकडे ये-जा करत असतात. याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसत आहे. मुंबई – गोवा महामार्गापासून कळसुली डोंगरी फाटा नजीक पर्यंत लहान मोठ्या सर्व मोऱ्यांचा खचलेला भराव व खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी वाहनचालकांनमधून केला जात आहे. या प्रकाराकडे सां. बां.विभाग लक्ष देणार की दुर्लक्ष करणार हे पाहणं गरजेचं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!