युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जल संवाद कार्यक्रम

युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जल संवाद कार्यक्रम

*कोकण  Express*

*युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जल संवाद कार्यक्रम*

*कासार्डे  ः संजय भोसले*

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जल संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लेखक श्री. प्रमोदजी कोयंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गडकिल्ल्यांवर कायम पाणी उपलब्ध करण्यासाठी योजना आखली, तसे प्रयत्न जलसंवर्धनासाठी करावे लागतील, असे प्रतिपादन लेखक-अभिनेता प्रमोद कोयंडे यांनी केले. नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. आजही महाराष्ट्रातील चाळीस हजार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. ही परिस्थिती पाहता सर्वांनी पाणी वाचविण्याबरोबरच पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचे प्रयत्न करायला पाहिजेत, असेही ते म्हणाले.

जलशक्ती मंत्रालयाचे राष्ट्रीय जल अभियान अंतर्गत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आयोजित जल संवाद कार्यक्रम पार पडला. ‘कॅच द रेन’ कार्यक्रमाअंतर्गत अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. पाणी व्यवस्थापन आणि पाणी अडविणे याबाबत समाजामध्ये प्रबोधनपर कार्यक्रम चालू आहेत. पाणी टंचाई ही जागतिक समस्या झाली आहे. पाऊस जेव्हा आणि जिथे पडेल त्यानुसार जलसंचय करणे या संकल्पनेसह हे जागरूकता अभियान देशभरात ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात राबवले जात आहे.

कार्यक्रमास श्री. प्रमोद कोयंडे, सौ. श्रावणी मदभावे श्री. सदाशिव पांचाळ, श्री. सचिन मेस्त्री, संचिता पावसकर, नेहरू युवा केंद्रचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक, देवगडचे सुजय जाधव, रीना दुदवडकर, वैभववाडी तालुक्याच्या श्रद्धा चव्हाण आणि प्रथमेश पौळ उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक रीना दुदवडकर यांनी केले तर सुजय जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!