चक्क चंदनाच्या मन्यांपासून साकारली भालचंद्र महाराजांची प्रतिमा

चक्क चंदनाच्या मन्यांपासून साकारली भालचंद्र महाराजांची प्रतिमा

­*कोकण Express*

*चक्क चंदनाच्या मन्यांपासून साकारली भालचंद्र महाराजांची प्रतिमा*

*कलाकार ओमकार वाघ व त्याच्या टीमची नवीन्यपूर्ण कलाकृती*

*कणकवली : मयुर ठाकूर*

योगियांचे योगी व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११८ वा जन्मोत्सावानिमित्त ओमकार वाघ व कुणाल संसारे यांच्यासह अन्य कलाकारांनी तब्बल ९० हजार चंदनाच्या मन्यांपासून परमहंस भालचंद्र महाराजांची प्रतिमा साकारली आहे.भालचंद्र महाराजांच्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने ही प्रतिमा संस्थान परिसरातील बाबांच्या तपश्चर्यास्थानाच्या शेजारी दर्शनासाठी ठेवली आहे .

भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओमकार वाघ व कुणाल संसारे यांनी चंदण्याचा मन्यांपासून प्रतिमा तयार करण्याचा निश्चिय केला होता. या निश्चियातून वाघ व संसारे यांच्यासह अन्य कलाकारांनी तब्बल ९० हजार चंदणाच्या मन्यांपासून भालचंद्र महाराजांची प्रतिमा तयार केली आहे.या कालाकारांना ही प्रतिमा तयार करण्यासाठी १० दिवस लागले असून ही प्रतिमा ४ फूटाची आहे. प्रतिमा आकर्षक बनविण्यासाठी वेगवेगळ्या अशा ३० रंगछटा वापरण्यात आलेल्या आहेत .

भालचंद्र महाराजांच्या जन्मदिनी या जन्मोत्सउत्सवाच्या निमित्ताने ही प्रतिमा संस्थान परिसरात भाविकांना पाहण्यासाठी ठेवली गेली आहे.ओमकार वाघ त्यांच्या सहकलारांनी यापूर्वी श्री. स्वामीसमर्थ महाराज,श्री. दत्तगुरु ,श्री.श्रीपाद वल्लभ,श्री. नृसिंह सरस्वती,यांच्यासह अनेक विभूतींच्या प्रतिमा साकारल्या आहेत.ही प्रतिमा पहाण्यासाठी अनेक भक्तगण भालचंद्र महाराज संस्थानात हजेरी लावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!