*कोकण Express*
*सोशल मीडियावर संदेश पारकर यांचीच क्रेज*
*टायगर अभी जिंदा है…..!*
*कणकवली : मयुर ठाकूर*
देवगड हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचे काम शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले. त्यामुळे सोशल मीडियावर ‘टायगर अभी जिंदा है, टायगर अभी जिंदा है..!! हे पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे देवगडच्या विजयानंतर संदेश पारकर यांच्या नेतृत्वाला पुन्हा उभारी मिळाली आहे .
संदेश पारकर यांच्या सारखा आक्रमक नेता २०१९ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत दाखल झाला. त्यानंतर संघटनेचे पद नसतानाही गेली तीन वर्ष सातत्यपूर्वक पक्ष संघटनेच्या हितासाठी झटत राहिले. देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये आक्रमक प्रचार, प्रभाग निहाय मतदारांच्या भेटी, सत्ताधारी लोकांवर आरोप करत सत्ता खेचून आणण्यासाठी काम केले. आमदार नितेश राणे यांच्या ताब्यातील सत्ता खेचून आणण्यासाठी पारकर यांनी मेहनत घेतली. नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकापासून ते आठ नगरसेवका पर्यंत संख्याबळ नेऊन ठेवले. त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये संदेश पारकर यांचे नेतृत्व दिसून आले. परिणामी देवगडच्या विजयानंतर शिवसैनिकांच्या फेसबुक, व्हाट्सअप, सोशल मीडियावर टायगर अभी जिंदा हे संदेश भाई तुम आगे बढो असे पोस्टर जोरदार व्हायरल होत आहेत.