महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झालेल्या रिद्धी हडकर हिचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झालेल्या रिद्धी हडकर हिचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

*कोकण  Express*

*महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झालेल्या रिद्धी हडकर हिचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार*

*सिंधुदुर्ग  ः संजना हळदिवे*

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी मालवणची सुकन्या कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. याबद्दल आस्था ग्रुपच्या वतीने रिद्धी हडकर हिचा नागरी सत्कार शुक्रवारी मालवण भंडारी हायस्कूल येथे करण्यात आला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून रिद्धी हडकर हिला शाल ,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. व कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, जि. प.सदस्य हरी खोबरेकर,महेश कांदळगावकर, मंदार केणी, प्रसाद आडवणकर, सूर्यकांत फणसेकर, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक खोत, उत्तम पडणॆकर, नंदकिशोर महाजन,अजय शिंदे, मंदार ओरोसकर, विद्या मेस्त्री, रामभाऊ पेडणेकर, अंतोन फर्नांडिस, रेनॉल्ड भुतेलो, शाम वारंग, निशिकांत पराडकर, जयसिंग पाटील, पंकज राणे, हरिश्चंद्र साळूंखे,नितीन मांजरेकर, संजय शिंदे, पप्पू परब, विक्रम मोरे, नंदू देसाई,नरेश हुले, लारा मयेकर,बाळू नाटेकर, ललित चव्हाण, विकी नेवाळे, मिथिल हिंदळेकर, मेघनाथ बांदेकर, पत्रकार मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, बंटी केनवडेकर,उमेश शिरोडकर, भाऊ सामंत, हरी चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!