*कोकण Express*
*जुन्या शिवसैनिकांच्या माध्यमातून उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*
*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांची माहिती*
तत्कालीन सावंतवाडीतील कट्टर व जुन्या शिवसैनिकांच्या माध्यमातून उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी कुणकेरी येथिल पाळणेकाेंंड धरणावर त्यांच्या स्मारकाला ही श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहीती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. दरम्यान यावेळी त्या ठीकाणी जूने शिवसैनिक उपस्थित राहणार असून सकाळी ९:३० वा. हा कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर यावेळी जास्तीत-जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री.साळगावकर यांनी केले आहे.
कै. ठाकरे यांची जयंती उद्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.