*कोकण Express*
*देवगड जामसंडे नगरपंचायतमध्ये भाजपाचा गट स्थापन*
*गटनेते पदी शरद ठुकरुल यांची निवड*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये काल सेना – राष्ट्रवादीने गट स्थापन केला होता. त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आठ नगरसेवकांनी गट स्थापन केला असून तसे पत्र सिंधुदुर्ग अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. गटनेते पदावर नगरसेवक शरद ठुकरुल यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.