*कोकण Express*
*राजेंद्र पेडणेकर यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, निर्माता, दिग्दर्शक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा ५७ वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आप्पासाहेब पटवर्धन चौकात कोविड काळात ऊत्कृष्ट सेवा दिले बद्दल नगरपंचायत कर्मचारी प्रविण बाळकृष्ण गायकवाड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. झेंडा चौक येथील पत्रकार अनिकेत मंगेश उचले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला तसेच श्री देव ढालकाढी येथील व्यावसायिक श्री जयेश वाळके यांचा सत्कार करण्यात आला. श्री देवी पटकी मंदिर येथील रहिवासी आणि नगरपंचायत माजी कर्मचारी सुभाष गोविंद उबाळे यांचा सत्कार करण्यात आला.
बाबा भालचंद्र महाराज संस्थान जवळील दत्तप्रसाद सामंत यांचा सत्कार करत अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.यावेळी सोबत बाळा कामतेकर,राजन पारकर,संदीप अंधारी,प्रथमेश चव्हाण,श्री. राणे व अन्य उपस्थित होते.