*कोकण Express*
*महान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण तालुक्यातील महान ग्रामपंचायतीच्या एका सदस्य जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार शरद दिगंबर गावडे यांनी विजयी संपादन केला. गावडे यांना ५८ तर विरोधी उमेदवार नीलकंठ मधुसूदन घाडी यांना ३४ मते मिळाली. बुधवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, शिवसेना मालवण शाखा कार्यालय येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या वतीने शरद गावडे यांना पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख संमेश परब, प्रसाद आडवणकर, युवासेना विभाग प्रमुख शशांक माने, शाखाप्रमुख दामोदर घाडी, उपशाखा प्रमुख हेमंत शिंदे, युवा अधिकारी विनोद गावडे, जयेश गावडे, सुनील घाडी, शंकर गावडे, अशोक बांदिवडेकर, हिमानी शिंदे व अन्य उपस्थित होते.