*कोकण Express*
*नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेची उद्या सत्यनारायणाची महापूजा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नांदगाव संन्मित्र रिक्षा संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे २० जानेवारी २०२२ रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे कार्यक्रम कोव्हीडचे सर्व नियम पाळून होणार आहेत. सकाळी ९ वाजता सत्यनारायणाची महापुजा, ११ वाजता महाआरती , दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता वारकरी भजन, दुपारी ३ वाजता हळदी कुंकु, संध्याकाळी ७ वाजता श्री दत्त माऊली पारंपारिक दशावतार नाटय मंडळ वेंगुर्ला यांचा महापौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सन्मित्र रिक्षा संघटना नांदगावच्यावतीने करण्यात आले आहे.