जाणवली ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतोष कारेकर विजयी

जाणवली ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतोष कारेकर विजयी

*कोकण Express*

*जाणवली ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतोष कारेकर विजयी….!*

*सेनेच्या भालचंद्र दळवी यांचा मोठ्या मताधिक्याने केला पराभव…!*

*तहसीलदार कार्यलया बाहेर भाजपकडून जल्लोष…!*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

जाणवली ग्रामपंचायत पोटनिवडणुक एका जागेसाठी आज तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपचे संतोष कारेकर यांनी सनेचे भालचंद्र दळवी यांचा पराभव केला.

संतोष कारेकर यांना 297 मते, भालचंद्र दळवी यांना 121 मते तर नोटा -3 एकूण 421 असे मतदान झाले.
त्यामुळे 176 मतांनी श्री कारेकर यांचा मोठ्या फरकाने विजय झाला.निवडणूक मतमोजणी कणकवली तहसील कार्यालय येथे तहसीलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जाधव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

निवडणूक निकालानंतर भाजप कडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री व संतोष कानडे यांनी विजयी उमेदवार कारेकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.यावेळी भाजपचे नगरसेवक अण्णा कोदे,संदीप मेस्त्री,संदीप सावंत,सरपंच सौ.राणे,भगवान दळवी,लक्ष्मण घाडीगवकर, स्वप्नील चिंदरकर,नितीन पाडावे, पप्पू पुजारे,गणेश तळगावकर, मकरंद सावंत,राजू हिर्लेकर,समीर प्रभुगावकर,अभय गावकर,सर्वेश दळवी,सौ.कारकेर आदी उपस्थित होते.

तर तहसीलदार कार्यालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच विजयी उमेदवारांना मनाई आदेश असल्याने मिरवणुका काढता येणार नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!