*कोकण Express*
*कुडाळमध्ये भाजपचा 8 जागांवर विजय ..*
*तर सेना 7 आणि काँग्रेस 2 जागांवर विजयी…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ नगरपंचायतीच्या मतमोजणीला पूर्ण झाली असून, कुडाळ मध्ये भाजपने 8 जागांवर विजय मिळवला असून, शिवसेनेने 7 तर काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला आहे.
भाजपने प्रभाग 2 मध्ये नयना मांजरेकर, प्रभाग 3 मध्ये चांदणी कांबळी, प्रभाग 5, 6, 7, 11, 12, 17 मध्ये अनुक्रमे अभिषेक गावडे, प्राजक्ता बांडेकर, विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, संध्या तेरसे, रामचंद्र परब यांनी विजय मिळवला असून, शिवसेनेने प्रभाग 1 मध्ये ज्योती जळवी, प्रभाग 4 मध्ये श्रुती वर्धन, प्रभाग 9 मध्ये श्रेया गावडे, प्रभाग 13 मध्ये सई कळप, प्रभाग 14 मध्ये मंदार शिरसाट, प्रभाग 15 मध्ये उदय मांजरेकर, प्रभाग 16 मध्ये किरण शिंदे यांनी विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने प्रभाग 8 आणि 10 मध्ये अनुक्रमे अफिन करोल आणि अक्षता खटावकर यांनी विजय मिळवला आहे.