*कोकण Express*
*वेताळ प्रतिष्ठानचे युवा वर्गाला प्रेरणा देण्याचे कार्य उल्लेखनीय…*
*अनुश्री कांबळी; जिल्हास्तरीय युवा संमेलन उत्साहात संपन्न…*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठानच्या माध्यमातुन युवकांसाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. असे नाविन्यपूर्ण उपक्रम युवकांपर्यंत पोहचवणे, त्यापासून संधी उपलब्ध करून देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान नेहमीच करत असते. प्रतिष्ठानच्या अशा उपक्रमातून युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले. तर युवकांनी समस्यांशी संघर्ष करत उद्दिष्ट्य साध्य करा त्यासाठी मेहनत , सातत्य आणि आत्मविश्वास त्रिसूत्री आत्मसात करा, असे आवाहन युवकांना केले.
नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल लौकीक च्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय युवा संमेलन कार्यक्रर्माच्या उदघाटन प्रसंगी त्या मार्गदर्शन करत होत्या. या जिल्हास्तरीय युवा संमेलन चे उद्घाटन प.स.सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच अशोक दाभोलकर, शिक्षणतज्ञ रमण किनळेकर, महिला व बाल संरक्षण सामाजिक कार्यकर्ता सविता कांबळी, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव सचिन परुळकर, प्रा.एस.बी. खानोलकर, बी.टी. खडपकर, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी,मिलन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवक व युवतीनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांचा विशेष सन्मान युवा संमेलनात मा.सभापती व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.यामध्ये कबड्डी मद्ये विशेष कामगिरी करणारा भक्तीयश साळगावकर, नॅशनल शुटिंग क्रीडा प्रकारात राष्ट्रीयस्तरावर निवड झालेली सानिया आंगचेकर, संगीत व गायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे नितीन धामापूरकर, टेनिस बॉल क्रिकेट महाराष्ट्र संघात निवड झालेल्या अपूर्वा परब व सेवा होडावडेकर, नृत्य क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणारी कथ्यक विशारद मृणाल सावंत यांच्या नेहरू युवा केंद्र व वेताळ प्रतिष्ठानच्या शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. तर अशोक दाभोलकर यांच्या कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंचकडून ‘आदर्श सामाजिक बांधिलकी कार्यकर्ता पुरस्कार’ पाच महिला शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं यामद्ये शिक्षिका शामल शंकर मांजरेकर, सृष्टी हरिश्चंद्र तांडेल, श्वेता सत्यभास गवंडे, ऋतिका रमेश राऊळ, स्वरा प्रमोद काळसेकर आदींचा सन्मान करण्यात आला.
या युवा संमेलनाच्या दोन सत्रात वक्त्यांनी विविध विषयांवर युवक व युवतींना मार्गदर्शन केलं. प्रथम सत्रात बी.टी.खडपकर यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ विषयावर भाष्य करीत व्यावसायिक बना असे आवाहन युवकांना केले, तर प्रा.एस.बी. खानोलकर यांनी ‘युवकांची देशासाठी भूमिका’ स्पष्ट करत स्वनिर्मितिसाठी प्रगल्भ व्हा असे आवाहन केले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सविता कांबळी यांनी बाल सरक्षण आणि महिला सक्षमीकरण साठी युवाई ने पुढे येऊन पीडितांना न्याय मिळवून द्यावा तर मिलन नाईक यांनी योगाची दैनंदिन जीवनात गरज स्पष्ट करीत सखोल मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे पंच अशोक दाभोलकर यांनी खेळ व व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले. युवा संमेलन यशस्वी होण्यासाठी महेश राऊळ,लविना डिसोझा, सागर सावंत, बंटी सावंत, रोहन राऊळ, अक्षता गावडे, हेमलता राऊळ, शुभम सावंत, अक्षता गावडे, सानिया वराडकर, प्रीती परुळकर,निखील ढोले,दक्षता गावडे,हर्षल आरोलकर यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार किरण राऊळ यांनी मानले.