कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या शाळा सुरू कराव्यात:शिक्षण सभापती अनिशा दळवी

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या शाळा सुरू कराव्यात:शिक्षण सभापती अनिशा दळवी

*कोकण Express*

*कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या शाळा सुरू कराव्यात:शिक्षण सभापती अनिशा दळवी*

*सिंधुदुर्ग*

ओमायक्रोनची धास्ती आणि कोरोना च्या तिसर्‍या लाटेत अचानक शाळा बंद झाल्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहत आहे त्यामुळे शासनाने कोरोणाचा प्रादुर्भाव नसलेल्या शाळा सुरू कराव्या अशी शिक्षक संघटना आणि शालेय व्यवस्थापन समित्या, पालक यांच्याकडून मागणी वाढत असून राज्य शासनाने या मागणीचा विचार करून ग्रामीण भागातील शाळा सुरू कराव्यात अशी मागणी जि प शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी राज्य शासनाकडेकेली आहे
राज्यात आणि देशात ओमायक्रोन आणि कोरोणा ची तिसरी लाट चा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे गेले तीन महिने सुरू असलेली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अचानक बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि ऑनलाइन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे असे आदेश दिले होते परंतु ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हीटी नसल्यामुळे व अन्य गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहू लागले आहेत, जिल्ह्यातील अनेक गावात कोरोणाच्या तिसर्‍या लाटेत एकही रुग्ण न सापडलेले अशा बऱ्याच गावांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करणे शक्य असून गेल्या काही दिवसापासून शिक्षक संघटना आणि आता ग्राम शालेय व्यवस्थापन समित्या यांच्यामार्फत ग्रामीण भागातील शाळा सुरू कराव्यात अशी पालक वर्गातून ही मागणी वाढू लागली आहे .शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे बौद्धिक आकलन शक्ती कमी होत आहे
गेल्या दोन वर्षात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक भौतिक भविष्यात भरून न येणारे असे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शाळा बंद न करता यावर शासनाने ठोस उपाय योजना करून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे दोन टप्प्यात शाळा सुरू ठेवून शिक्षकांमार्फत अध्यापन सुरू ठेवावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि पालक वर्गातून होऊ लागली आहे कोरोनाचा या महा मारीत पालक आर्थिक मानसिंक विवंचनेत पडले आहेत कोरोनाचा महामारी मुळे शाळा बंद ठेवणे हा पाल्यांच्या दृष्टीने पर्याय नसून जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मोठ्या प्रमाणात 100% लसीकरण पूर्ण झाले आहे, टप्प्याटप्प्याने उर्वरित लसीकरणाचा कार्यक्रम शासन हाती घेत आहे सिंधुदुर्गात सध्यातरी ग्रामीण भागात कोरोनाची तिसर्‍या लाटेत गंभीर परिस्थिती नसून जिल्ह्यात अनेक गावे एकही कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत अशा गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा कोरोना चे नियम निकष पाळून सुरू ठेवण्याबाबत शासनाने विचार करावा सध्या शासनाने ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली आहे व शाळा बंद आहेत याचा पालक वर्गावर मानसिक दृष्ट्या परिणाम होत असून विद्यार्थी वर्गावर ही त्याचा विपरीत परिणाम होत आहे गेल्या तीन महिन्यात शाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन वाढले होते परंतु आता पुन्हा शाळा बंद झाल्यामुळे त्याचा शैक्षणिक दुष्ट परिणाम होत असून ऑनलाईन तसेच गृह भेटीद्वारे अध्यापन होत नाही भावी पिढी सक्षम नागरिक बनविण्यासाठी ऑनलाईन प्राथमिक शिक्षण हे योग्य प्रकारे होत नसल्यामुळे भावी पिढी बरबाद होत असल्याचे आम्हाला पालक वर्ग कडून पाहावत नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा दोन टप्प्यात सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागले आहे याचा शासनान विचार करावा अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षक संघटना आणि पालक शालेय व्यवस्थापन समिती आन कडून वाढू लागली आहे तरी शासनाने याचा विचार करावा आणि कोरोणा चे नियम निकष पाळून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी शिक्षण सभापती अनिषा दळवी यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!