कलमठ येथे राज्य क्रीडा दिन साजरा खाशाबा जाधव यांच्या आठवणींना उजाळा

कलमठ येथे राज्य क्रीडा दिन साजरा खाशाबा जाधव यांच्या आठवणींना उजाळा

*कोकण Express*

*कलमठ येथे राज्य क्रीडा दिन साजरा खाशाबा जाधव यांच्या आठवणींना उजाळा*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिन असून या दिवशी राज्य क्रिडा दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर  कोरोनाबाबतचे  शासन नियमाचे पालन करत  कणकवली तालुक्यातील कलमठ  तांबे भवन येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुरत्न तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

तायक्वांदो खेळाडूंनी या कार्यक्रमात  उत्स्फूर्त सहभाग घेत खाशाबा जाधव यांच्या स्मृतीना उजाळा दिला . यावेळी दुर्वा पवार ,आर्या ठाकुर, सौम्या ठाकुर , मृण्मयी पडवळ आदी खेळाडूंनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी  तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव  भालचंद्र कुलकर्णी , राष्ट्रीय प्रशिक्षिका जयश्री कसालकर, कुडाळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचे सहसचिव संतोष पवार, साईराज सावंत , बालदत्त सावंत , सई पाटील , निधी हजारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!