*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता मुक्त संचार करणं धोकादायक*
*भर दिवसा चॉपर हल्ल्यांचे आलेख प्रमाण वाढीकडे चालले*
*आज सावंतवाडीतही घडला तोच प्रकार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा भागात एका युवकावर चॉपरनं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक वृत्त समोर येत आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांना याबाबत विचारणा केली असता, एक माणूस चॉपर घेऊन संबंधित परिसरात फिरत होता. ज्या व्यक्तीनं ही माहिती दिली त्या व्यक्तीलाच चॉपर लावल्याचं त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितल. संबंधित चॉपर धारकाचा शोध घेतला असता तो सापडून आला नाही. तर याबाबत अद्याप संबंधितांकडून पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही. परंतु, दक्षता म्हणून आम्ही सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा शोध घेत आहोत अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.