*कोकण Express*
*योगाला वयाचे बंधन नसते, ते कोणत्याही वयात करता येते.*
*कोरोनामुळे स्वतःच्या आरोग्याची आणि योगाची खरी कींमत लोकांना कळली;बापु पाडालकर*
*कासार्डे ः संजय भोसले*
संपूर्ण जगभर धुमाकूळ घालणारा व्हायरस म्हणजे कोरोना. याचा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे स्वरूप बदलणे. सुरुवातीला कोवीड-19 म्हणून प्रसारीत पावलेला तो व्हायरस. डेल्टा नंतर आता ओमीक्राॅनमध्ये स्वरूप बदलून लोकांच्या जीवाशी खेळत आहे. याला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतली आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढून योग प्राणायाम केला व आंतरिक शक्ती वाढवली तर त्यावर निश्चित मात करता येते. असे भारत स्वाभिमान राज्य प्रभारी बापू पाडळकर यांनी मत व्यक्त केले. ते कणकवली येथील वृंदावन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पतंजली योग समिती राज्य प्रभारी चंद्रशेखर कापणे ,पतंजली योग समिती प्रभारी डॉक्टर रावराणे ,महिला आघाडी प्रमुख व योग शिक्षिका श्वेता गावडे, किसान सेवा समिती प्रभारी सुभाष गोवेकर. आदी मान्यवर उपस्थित होते.
75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्या बरोबरच देशभर 75 कोटी सूर्यनमस्काराच्या उपक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी बापू पाडळकर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते पुढे म्हणाले की योगासने आता मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले पाहिजे, कारण योगासनाने आंतरिक शक्ती वाढण्यास मदत होत असून व्हायरल इन्फेक्शनशी लढण्याची ताकद निर्माण होते. “योगाला वयाचे बंधन नसते ते कोणत्याही वयात करता येते. ” योग ही आता एक प्रकारची इंडस्ट्री निर्माण झाली असून रामदेव स्वामीजींच्या प्रयत्नाने योगाला सर्वप्रथम खेळ या संकल्पनेचा दर्जाही प्राप्त झाला आहे. शिवाय “कोरणा मुळे आपल्याला आरोग्याची आणि योगाची खरी किंमत ही कळली आहे.”
तर शेखर खापणे आपल्या मनोगतात म्हणाले की पुणे जिल्हा नंतर सर्वात जास्त योगाचे कार्य महाराष्ट्रात कुठे होत असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असून 75 कोटी सूर्यनमस्काराचा उपक्रम शाळा, संस्था ,महाविद्यालय यांच्यामार्फत तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे व योगाचे उद्दिष्टही जनतेला कळाले पाहिजे.
या कार्यक्रमाला भारत स्वाभिमान प्रभारी महेश भाट, युवा प्रभारी पाटणकर, मीडिया प्रभारी रावजी परब ,कुडाळ तालुका प्रभारी गवस रवींद्र, पावस्कर ,भरत गावडे ,कणकवली तालुका प्रभारी प्रकाश कोचरेकर, भारत स्वाभिमान प्रभारी कांबळी, घनश्याम सावंत ,कार्यालय प्रमुख प्रकाश रेडकर, तालुका प्रभारी संजय भोसले ,योग शिक्षक लिमये, सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली परिवाराचे सर्व पदाधिकारी व प्रत्येक तालुका पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉक्टर रावराणे यांनी केले. तर महेश भाट यांनी उपस्थितांचे आभार मानले.