देवगड आगारातील स्थानक प्रमुख यांच्या भिंतीवर नोटीसीची रांगोळी काढून भिंतीचे विद्रुपीकरण

देवगड आगारातील स्थानक प्रमुख यांच्या भिंतीवर नोटीसीची रांगोळी काढून भिंतीचे विद्रुपीकरण

*कोकण  Express*

*देवगड आगारातील स्थानक प्रमुख यांच्या भिंतीवर नोटीसीची रांगोळी काढून भिंतीचे विद्रुपीकरण !*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

जिल्ह्यात तसेच राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संप सुरू आहे. वेळोवेळी संघटना, समिती, पदाधिकार्‍यांच्या चर्चा होवून काही अंशी पगारवाढ, महागाईभत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ करूनही संपकरी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतलेला नाही. आगारातील १७० कर्मचाऱ्यांना कामावर हजर न झाल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख यांनी दिली असली तरी स्थानक प्रमुख यांच्या दालना बाहेरील भिंतीवर एक प्रकारे नोटीसीची रांगोळी काढून भिंतीचे विद्रुपीकरण केल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीने नोटीस लावणे योग्य आहे का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात तसेच राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संप सुरू आहे. वेळोवेळी संघटना, समिती, पदाधिकार्‍यांच्या चर्चा होवून काही अंशी पगारवाढ, महागाईभत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ करूनही संपकरी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतलेला नाही. ७३ वर्षे जुन्या असलेल्या एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी संपकरी चिवटपणे झुंज देत आहेत. परंतु यावर तोडगा न निघाल्याने प्रशासनाकडून संपकरी कर्मचार्‍यांवर सेवा समाप्ती, निलंबन, कारणे दाखवा नोटीस देत बडतर्फीची कारवाई केली जात आहे.आतापर्यंत आगारात दोन लिपिक एक वाहन परीक्षक,एक हेड मॅकेनिक असे सहा कर्मचारी हजर झाले आहेत.
दरम्यान, संपात सहभागी झालेल्या देवगड आगारातील १७० कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.नोटिसा संपकरी कर्मचाऱ्यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या असून देवगड आगारातील भिंतीवरही नोटीस लावण्यात आल्या आहेत अशा पद्धतीने भिंतीवर नोटीस लावून आगाराचे विद्रुपीकरण करणे योग्य आहे का अशा नोटीस लावून धरले जाणार का मग हा खटाटोप आगार व्यवस्थापकांनी का केला आणि इमारतीचे विद्रुपीकरण करून काय साध्य होणार आता याकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का असा सवाल सर्वसामान्य प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहेे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!