*कोकण Express*
*नगरपंचायतीचा भ्रष्टाचार थांबता थांबेना: विलास साळसकर*
देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये आचार संहिता असताना देखील विकास कामे केली जात आहेत. ती सदय स्थितीमध्ये थांबविण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी देवगड-जामसंडे नगरपंचायत यांना दिले आहे.
या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये नगरपंचायत सहाय्य योजना सन 2018-19 अंतर्गत विदयुत पथदिप भाग-2 मध्ये मंजुर रक्कम 23 लाख 1982 एवढया रकमेचे काम मंजुर करण्यात आले असून अमित इलेक्ट्रिकल्स प्रोप्रा विजय सावंत सावंतवाडी यांना या कामाचा मक्ता देण्यात आला आहे. त्यापासून आज मितीपर्यंत हे पथदिप बसविण्यात आलेले नाहीत. या मंजूर पथदिप पोलाचे काम सध्यस्थितीमध्ये प्रभाग निहाय मागणीनुसार बसविण्याचे काम सुरु आहे.
देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुक कार्यक्रम सुरु असून या कालावधीत आचार संहित लागू असल्याने आचार संहितेच्या काळात कोणतीही विकास कामे करता येत नाही असे असतानाही मागील दोन वर्षापासून मंजूर असलेली पथदिप पोलाचे काम सदयस्थितीत आचारसंहित कालावधीत सर्व प्रभागात सुरु आहे. हे पथदिप पोलाचे विकास काम करणे म्हणजे मतदारांना सत्ताधारी नगरसेवकांनी आमीष दाखविल्यासारखेच आहे तरी सदर पथदिप पोलाचे काम तात्काळ थांबविण्यात यावे व सध्या चालू असलेल्या कामाचे बील अदा करण्यात येवू नये. प्राप्त माहितीनुसार भाग -2 या कामाचे बील यापुर्वी अदा केल्याचे समजते तरी देखील या मंजूर कामाची एकुण रक्कम किती व किती पथदिपांना मंजूरी आहे याची माहिती सविस्तर देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी या निवेदनाव्दारे केली आहे.