कणकवली रोटरी क्लबच्या ‘इन्टेंसीव्ह केअर अ‍ॅम्बुलन्स’चा उद्या लोकार्पण सोहळा

कणकवली रोटरी क्लबच्या ‘इन्टेंसीव्ह केअर अ‍ॅम्बुलन्स’चा उद्या लोकार्पण सोहळा

*कोकण Express*

*कणकवली रोटरी क्लबच्या ‘इन्टेंसीव्ह केअर अ‍ॅम्बुलन्स’चा उद्या लोकार्पण सोहळा*

*जिल्हयाच्या आरोग्य सुविधेत भर:डॉ. विद्याधर तायशेटे*

*कणकवली ःःसंंजना हळदिवे* 

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल परिवाराने सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी ‘इन्टेंसीव्ह केअर अ‍ॅम्बुलन्स’ आणली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार 14 जानेवारी रोजी सायं 5 वा. संजीवनी हॉस्पीटल कणकवली येथे होणार आहे. इंटरनॅशनल रोटरी फाऊंडेशन आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या सहभागातून सुमारे तीस लाख रुपये खर्च करून ही अ‍ॅम्बुलन्स आणण्यात आली असून जिल्हयाच्या आरोग्य सुविधेत यामुळे भर पडणार असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांनी दिली. संजीवनी हॉस्पीटलमध्ये आयोजीत पत्रकार परीषदेत बोलत होते.

यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष दादा कुडतकर, दीपक अंधारी, लवू पिळणकर, रविंद्र मुसळे, गुरु पावसकर, अनिल कर्पे, वर्षा बांदेकर, नितीन बांदेकर, श्री. लिमये आदी उपस्थित होते. डॉ. तायशेटे म्हणाले 14 जानेवारी 2009 साली कणकवली रोटरी क्लबची स्थापना झाली. गेल्या 12 वर्षात अनेक सामाजिक , सांस्कृतिक, आरोग्यविषयक उपक्रम रोटरीने राबवले. जिल्हावासीयांसाठी एक आधुनिक सोयींयुक्त कार्डीयाक केअर अ‍ॅम्बुलन्स आणावी असे रोटरी क्लबचे स्वप्न होते. त्यासाठी आम्हाला रोटरी फाऊंडेशनने मोलाचे सहकार्य केले. सुमारे तीस लाख वीस हजार खर्चाच्या या इन्टेंसीव्ह केअर अ‍ॅम्बुलन्ससाठी रोटरी क्लब कणकवलीने 15 लाख रुपये दिले तर 15 लाखाचा खर्च रोटरी फाऊंडेशनने उचला. सिंधुदुर्गात रोटरी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रथमच कणकवली रोटरी क्लबने हा उपक्रम राबवला आहे. या अ‍ॅम्बुलन्समध्ये व्हेंटिलेटर, कार्डीयॅक मॉनिटर, संक्शन, ऑक्सीजन, सिंरीज अशा सुविधा आहेत तसेच चार तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रत्येकी दोन पुरूष आणि महिला आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, दोन ड्रायव्हर असणार आहेत.कणकवली कोल्हापूर, कणकवली गोवा, कणकवली मुंबई अशा मार्गावर ही अ‍ॅम्बुलन्स सुविधा उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेला किफायतशीर असेे दर असणार आहेत आणि नॉन कोविड रुग्णांसाठी प्राधान्याने ही अ‍ॅम्बुलन्स दिली जाणार आहे.

या अ‍ॅम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा प्रांतपाल संग्राम पाटील, गौरीश धोंड यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून टी. बी. लुल्ला, चॅरीटेबल फाऊंडेशनचे किशोर लुल्ला तसेच कणकवली नगराध्यक्ष समीन नलावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. सीकलगार, प्रांतसेक्रेटरी प्रशांत मेहता, शरद पैय, शशिकांत चव्हाण, राजेश घटवाल, प्रणय तेली, सिताराम कुडतरकर, रमेश तिवारी, श्री वल्लभ आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे , सेक्रेटरी वर्षा बांदेकर, माजी अध्यक्ष लवू पिळणकर यांनी केले आहे.यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!