*कोकण Express*
*उपजिल्हा रुग्णालय परिसरातील रस्ता दुरुस्त करा, अन्यथा २६ जानेवारीला उपोषण*
*सामाजिक बांधिलकी संघटनेचे बांधकाम विभागास निवेदन*
*सिंधुदुर्ग :*
उपजिल्हा रुग्णालय परिसरातील रस्ता संपूर्णपणे खराब आणि खड्डेमय झाला असल्याने सिजर झालेल्या महिलांना ने – आण करतेवेळी त्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असून असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून येत्या आठ दिवसात सबंधित रस्ता दुरुस्त करण्यात यावा. अन्यथा २६ जानेवारी, २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक बांधिलकी संघटनेच्या वतीने बांधकाम विभागास देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन सामाजिक बांधिलकी या संघटनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सतिश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, रवी जाधव, अँड अशोक पेडणेकर यांनी उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांच्याकडे दिले आहे.
यावेळी या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत यापूर्वी देखील हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सबंधित रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास २६ जानेवारी, २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.