*कोकण
*देवगड जामसंडे न.प.निवडणूक भाजप प्रचाराचा शुभारंभ*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उर्वरित प्रभाग क्रमांक ४,५,७,८ या चार प्रभागांसाठी १८ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामदेवता माता श्री दिर्बादेवी ,श्री देव रामेश्वर दर्शन घेण्यात आले.या वेळी माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,सरचिटणीस शरद ठुकरुल ,तालुका उपाअध्यक्ष महेश पाटोळे,शहर ध्यक्ष योगेश पाटकर माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर प्रणाली माने,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर ,उमेश कणेरकर,प.स.सदस्य अजित कांबळे,विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे,महिला पदाधिकारी वैशाली तोडणकर,तन्वी चांदोस्कर,मिलिंद मानेधीरज बाणे, राजा भुजबळ,संजय बांदेकर,भाजप उमेदवारप्रभाग ७ उमेदवार योगेश चांदोस्कर,प्रभाग क्र ८ निधी पारकर,प्रभाग क्र ४ मृणालिनी भडसाळे,प्रभाग क्र ५ मनीषा जासंडेकर तसेचभारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांनी यापूर्वी पार पडलेल्या १३ प्रभागातील तसेच या चार प्रभागातील उमेदवार देवगड न.प.माध्यमातून तसेच आम.नितेश राणे यांनी राबविलेल्या विविध उपक्रम,आम.अजित गोगटे यांचे मार्गदर्शन यामुळे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील व देवगड जामसंडे न.वर भाजपची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला