विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवावी : रवी पाळेकर

विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवावी : रवी पाळेकर

*कोकण Express*

*विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवावी : रवी पाळेकर*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. यशाची ही परंपरा कायम ठेवावी असा विश्वास सभापती रवी पाळेकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदूर्ग व देवगड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेतील देवगड तालुक्यातील इ.५ वी मधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी प्रजापति थोरात, पं. स. सदस्य अजित कांबळे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, जिल्हा नेते अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उल्हास मुंबरकर, केंद्रप्रमुख लहू दहिफळे आदी उपस्थित होते.

देवगड तालुक्यातील २७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आले. यामध्ये ग्रामीण राज्यस्तरमध्ये प्रणव दहिफळे, हर्षदा चोपडे, ग्रामीण सर्वसाधारण वैभवी वाडकर, अर्थव खरात, श्रेया पाटील, पृथ्वीराज पाटील, हर्ष लळीत, आर्या राणे, सौरभ हिंदळेकर, सोहम हिर्लेकर, गुंजल अंबारे, प्राजक्ता भिडे, संस्कृती गुरव, शहरी सर्वसाधारण राज्ञी कुलकर्णी, मित कुलकर्णी, दिया गावंकर, दिक्षा विवेक मेस्त्री, सुयोग कडू यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!