*कोकण Express*
*देवगड पंचायत समितीच्या सभागृहातील बैठक व्यवस्थेचे तीन तेरा*
*पंचायत समिती सदस्य मूग गिळून गप्प का ?*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहातील बैठक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अधिकाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे गटविकास अधिकारी लक्ष देणार का असा सवाल सभागृहात उपस्थित केला जात असला तरी पंचायत समिती सदस्य मूग गिळून गप्प का ?
देवगड पंचायत समितीच्या सभागृहाचे डागडुजीचे काम यापूर्वी करून लाखो रुपये खर्च करण्यात आले होते परंतु आजही बैठक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अधिकाऱ्यांसह उपस्थित पत्रकारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे उपस्थित अधिकारी बैठक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अधिकार्यांना आपल्या मांडीचा आधार घेऊन त्यावर वहीमध्ये टिपणी करण्याची वेळ अधिकार्यांवर ओढावली आहे परंतु याकडे मात्र पंचायत समिती जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी येणाऱ्या सदस्यांकडून दुर्लक्ष केला जातोय की काय असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात असला तरी याकडे गटविकास अधिकारी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित बैठक व्यवस्था यांची डागडुजी करतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.