*कोकण Express*
*बांद्यात हळदीचे नेरुर येथील तरुणाचा अपघात*
*फिट येऊन पडल्याने अपघात झाल्याचा अंदाज*
*बांदा ः लवू परब*
मुंबई गोवा महामार्गावरील बांदा पोलीस चेकपोस्ट नजीक मोटरसायकलवरुन कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरुर येथील विशाल विजय चव्हाण (25) हा तरुण कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे. चालत्या मोटरसायकलवरच फीट आल्याने तो पडला असावा असा अंदाज बांदा पोलीसांनी व्यक्त केला. स्थानिकांनी जखमी अवस्थेत त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. बांदा पोलीस दीपक लोंढे, विजय जाधव घटनास्थळी दाखल झाले आहेत.