*कोकण Express*
*कणकवली पटवर्धन चौकात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह*
*एक जण शहरात राहणारा आहे व दुसरा मुंबईतून आलेला*
*कणकवली शहरात खळबळ उडाली*
*कणकवली ः मयुर ठाकूर*
कणकवली पटवर्धन चौक येथे कोरोना तपासणीमध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधित संख्या वाढ होण्याची भीती आहे.
कणकवली शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये,यासाठी नगरपंचायतने पुढाकार घेत आरोग्य विभाग यांच्या मदतीने पटवर्धन चौक येथे कोरोना तपासणी पथक ७ जानेवारी पासून तैनात केलं आहे.
त्यामध्ये रॅपिड व आर. टी.पी.सी. आर तपासणी करण्यात येत आहे.रविवारी आरोग्य कर्मचारी नीलम कांबळे ,नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, विनोद सावंत रमेश कदम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
रविवारी सकाळ पासून दुपारपर्यंत ५२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत.यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये एक जण शहरात राहणारा आहे व दुसरा मुंबईवरुन गावी दाखल झालेला असल्याने कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.