*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज १०७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.०८:*
जिल्ह्यात आज १०७ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतपर्यंत एकूण ५१ हजार ७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.