*कोकण Express*
*वैभववाडी-नाधवडे येथे उद्या बैलगाडी शर्यत स्पर्धा…*
*बंड्या मांजरेकर मित्र मंडळाचे आयोजन; निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
श्री बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्यावतीने रविवार दि. ९ जानेवारी रोजी भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी खासदार डॉ. निलेश राणे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रुपये ११ हजार १११ व चषक, द्वितीय क्रमांकास रुपये ७ हजार ७७७ व चषक, तृतीय क्रमांकास रुपये ५ हजार ५५५ व चषक तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे, उत्कृष्ट चालक, उत्कृष्ट जोडी, यांना देखील रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहेत. ही स्पर्धा नाधवडे येथील मैदानावर संपन्न होणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी ५०० रुपये इतकी राहणार आहे.
या स्पर्धेची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. शासनाच्या जवळपास २७ अटी व शर्तींचे पालन करून ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले आहेत. या स्पर्धेला रत्नागिरी, कोल्हापूर, कराड, कणकवली, डोंबवली व बेळगाव या ठिकाणाहून बैलजोड्या दाखल होणार आहेत.
अधिक माहितीसाठी दयानंद तानवडे 8788544594, वैभव कोकाटे 9552099914 यांच्याशी संपर्क साधावा. तरी या स्पर्धेला स्पर्धा प्रेमींनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पं स. चे माजी उपसभापती दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर यांनी केले आहे.