*जिल्ह्यातल्या शाळा ६ जानेवारीपासून बंद : डॉ.अनिषा दळवी*
*वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय*
*दोडामार्ग ः लवू परब*
कोरोनाच्या रूग्ण संख्येत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढ होत असून त्याचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी उद्या ६ जानेवारीपासून शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे शिक्षण व आरोग्य सभापती आनिशा दळवी यांनी सांगितले.मात्र गृह भेटीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या शिक्षकांना सूचना देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या चार-पाच दिवसात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. दरम्यान कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या चारपाच दिवसात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊन कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे.