*कोकण Express*
*काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी महेश तेली, उपाध्यक्षपदी अमोल साटम…*
कणकवली तालुका काँग्रेस सभा : विशेष कार्यकारी पदांसाठी नावे देण्याचे आवाहन…
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी महेश तेली तर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अमोल साटम यांची नियुक्ती झाल्याचे आज काँग्रेसच्या मासिक सभेत जाहीर करण्यात आले. याखेरीज विशेष कार्यकारी अधिकारी पदांसाठी नावे द्यावीत असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केले.
कणकवली तालुका काँग्रेसची मासिक सभा आज काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीचे नागेश मोरये, इर्शाद शेख, एम.एम.सावंत, एच.बी. रावराणे यांच्यासह सुनीता म्हापणकर, प्रवीण वरूणकर, बी के तांबे, किरण टेंबुलकर, नीलेश तेली, प्रदीप तळगावकर, प्रदीपकुमार जाधव, चंद्रकांत पवार, पंढरी पांगम, विजय कदम, संदीप कदम, महेश तेली, प्रवीण सावंत, रवींद्र डगरे, अमोल साटम, संतोष तेली, प्रमोदीनी कुडतरकर, नीलेश मालंडकर, बंटी मेस्त्री, भिवाराम परब, डॉ. प्रमोद घाडीगावकर, अजू मोर्ये आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या बैठकीत तालुका विस्ताराबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेण्याचेही निश्चित करण्यात आले. तर तालुक्यातील विकासकामे कार्यकर्त्यांनी आणावीत ती सरकारच्या माध्यमातून मंजूर करू अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली. यावेळी संतोष नाईक, मनोज तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला.