*कोकण Express*
*१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आजपासून प्रारंभ*
*जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांकहे होणार लसीकरण – डॉ.महेश खलिपे*
*सिसिंधुदुर्गनगरी*
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ४० हजार विद्यार्थ्यांना आज पासून कोरोना प्रतिबंधक (कोव्हॅक्सिन) लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे यांनी आज दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार आज पासून १५ ते १८ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.या लसीकरनासाठी कोव्ह्यक्सिन लस चा वापर केला जाणार आहे. ज्यांचा जन्म २००७ पूर्वी झाला आहे त्याना लस दिली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली लस उपलब्ध आहे जिल्ह्यात ४० हजार लस उपलब्ध आहे. या लासिकरना साठी शिक्षण व आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. शिक्षण विभागाने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे तसेच इंटरनेट सुविधा,डाटा ऑपरेटर आणि कक्ष उपलब्ध करून द्यावा. तर आरोग्य विभागाकडून लस, लसीकरणसाठी लागणारे साहित्य व मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सुमारे ४० हजार विद्यार्थी आहेत.लसिकरनात कोणताही व्यत्यय न आल्यास १५ दिवसात सर्व १५ ते १८ वयोगतातील विद्यार्थ्याचे लसिकरन पूर्ण केले जाइल.आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात आठ ठिकाणी लसीकरण सुरु आहे ४ तारीख पासून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालय मध्ये लसिकरन सुरु होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. व कोविड आजारापासून संरक्षित व्हावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी केले आहे.