देवगड नगरपंचायतीसाठी १३ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल

देवगड नगरपंचायतीसाठी १३ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल

*कोकण Express*

*देवगड नगरपंचायतीसाठी १३ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल…*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड येथील नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.१० जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर १८ जानेवारीला मतदान होणार असून १९ जानेवारी रोजी सर्व प्रभागांची मतमोजणी होणार आहे.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४,५,७,८ नगरपंचायतीचे हे प्रभाग नामाप्र साठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे चारही प्रभाग सर्व साधारण राहणार आहेत.अशा आदेशानंतर या चारही प्रभागांची निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. या चार प्रभागांची निवडणुक १८ जानेवारी रोजी होणार आहे. या प्रभाग क्रमांक ४ मध्ये मनिषा अनिल घाडी (शिवसेना) विरुध्द मृणाली महेश भडसाळे (भाजपा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर प्रभाग क्रमांक ५ मधून सुजाता उमेश कुलकर्णी (काँग्रेस) व मनिषा अनिल जामसंडेकर (भाजपा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ७ मधून रोहणी विश्वनाथ खेडेकर (शिवसेना),योगेश प्रकाश चांदोस्कर(भाजपा),प्रुफुल्ल भिकाजी कणेरकर (अपक्ष),सौरभ सुर्यकांत कुलकर्णी (अपक्ष), व राजेंद्र बाळकृष्ण मेस्त्री (अपक्ष) तर प्रभाग क्रमांक ८ मधुन संतोष रविंद्र तारी (शिवसेना),निधी नयन पारकर (भाजपा),प्रणव चंद्रकांत नाडणकर(अपक्ष),वैभव मिलिंद केळकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सर्वाधिक अर्ज प्रभाग क्रमांक ७ मधून पाच उमेदवारांनी दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक ४ व ५ हे सर्वसाधारण महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक ७ व ८ साठी सर्वसाधारण आरक्षण आहे. मात्र प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपा पक्षाने सर्वसाधारण आरक्षण असताना महिला उमेदवार दिली आहे. मागील झालेल्या १३ प्रभागांमध्येही प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वसाधारण आरक्षण असताना त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष प्रणाली माने यांना संधी दिली आहे. यामुळे १७ जागांपैकी भाजपाने ११ महिला उमेदवार दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!