*कोकण Express*
*उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपकडून शक्तिप्रदर्शन*
*सभागृहात मात्र ‘हम सब एक है ‘असे वातावरण…*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी 18 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी तहसील कार्यालय येथे केली आहे.ही निवडणूक प्रभाग क्रमांक ०४, प्रभाग क्रमांक ०५, प्रभाग क्रमांक ०७ व क्रमांक ०८ या चार प्रभागांमध्ये होत असून प्रभाग क्रमांक ०७ व ०८ मध्ये अनेक इच्छुक उमेदवार असल्यामुळे नक्की कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर हे आपला उमेदवारी अर्ज भाजपतर्फे दाखल करणार असून प्रभाग क्रमांक ०८ मध्ये लीना पारकर आपला उमेदवारी अर्ज भाजपतर्फे दाखल करणार असून प्रभाग क्रमांक ०५ मध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्यावतीने सुजाता कुलकर्णी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर प्रभाग क्रमांक ०४ मधून मनीषा अनिल घाडी या महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असले तरी किती अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.यावेळी तहसील कार्यालयामध्ये भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आदी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.