शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे यांना जाहीर

शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे यांना जाहीर

*कोकण Express*

*शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे यांना जाहीर*

*कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने पुरस्कारांची घोषणा*

*अनिल स्मृती ग्रामिण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर यांना पुरस्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकारीता , उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत . यात बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद अंधारी , शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे ( लोकमत ) यांना तर अनिल स्मृती ग्रामिण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर (रत्ना टाईम्स),उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार गुरुप्रसाद सावंत यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी ज्येष्ठ उद्योजक रघु नाईक व विल्बर्ट प्राॅपर्टीज कणकवलीचे दिनेश कुंभार आणि विल्सन पिंटो यांची तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी हेल्प अँकॅडमी फोंडाघाटचे संजय नेरुरकर यांची निवड करण्यात आली.

तालुका पत्रकार समितीच्या कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तेलीआळी येथील भवानी सभागृहात झाली .यावेळी तालुका सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम , उपाध्यक्ष उत्तम सावंत , सहसचिव मिलींद डोंगरे , सदस्य तुळशिदास कुडतरकर , भास्कर रासम , रंजिता तहसीलदार , गुरूप्रसाद सावंत , रमेश जामसांडेकर , हेमंत वारंग यांच्या उपस्थितीत झाली .

यावेळी तालुका पत्रकार समितीकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांना रोख रक्कम , स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र तसेच यशस्वी उद्योजक , सामाजिक कार्यकर्ता यांना स्मृतिचिन्ह , मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी ज्येष्ठ उद्योजक रघु नाईक व विल्बर्ट प्रापॅर्टीजचे विल्सन पिंटो व दिनेश कुंभार यांचीही यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . तसेच तालुका पत्रकार समितीला नेहमीच सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर उपरकर यांचाही विशेष सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले . पुरस्कार वितरणची तारीख व ठिकाण लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याचे तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे व खजिनदार नितीन कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!