*कोकण Express*
*शेवटी प्रमोद वायंगणकर कणकवली पोलीस स्टेशनला हजर*
*निवडणुकीचा कोणताही दबाव नसल्याचे पोलिसांकडे स्पष्टीकरण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील तरळे येथील प्रमोद महिपत वायंगणकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार २० डिसेंबर रोजी देण्यात आली होती. दरम्यान निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र श्री वायंगणकर हे आज ३ जानेवारी रोजी कणकवली पोलीस स्टेशन मध्ये हजर राहत त्यानी मी स्वतःहूनच कर्जाला कंटाळून घरातून निघून गेलो होतो अशी कबुली दिली आहे. काल रात्री ते पुण्याहून कणकवलीला यायला निघाले व आज त्यांनी कणकवलीत पोलीस स्टेशनला माहिती दिली. माझ्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे बेपत्ता प्रमोद वायंगणकर यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता स्पष्ट झाली आहेत.