*कोकण Express*
*दोडामार्ग येथे भाजपाच्याच दोन गटात हाणामारी…*
*एकनाथ नाडकर्णी यांच्यावर वाटेत हल्ला एकमेकांचे कपडे फाडले*
*दोडामार्ग ः लवू परब*
दोडामार्ग तालुक्यात भाजपाच्या पदाधिकारी यांनी काल फोनवरून एकमेकांना शिवीगाळ करून धमकी देणे ही घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता चार प्रभागातील निवडणूक संदर्भात चर्चा सुरू असताना या ठिकाणी दोन पदाधिकारी यांच्यात वाद चिघळला यावेळी काही पदाधिकारी यांनी सोडविले यावेळी एकनाथ नाडकर्णी घरी जात असताना एकनाथ नाडकर्णी यांना गाठून हल्ला केला यात नाडकर्णी जखमी झाले आहेत.शैलेश दळवी व इतर साथीदार यांनी हल्ला केला असा आरोप केला.
तर दुसऱ्या गटातील काही पदाधिकारी यांना मारहाण झाली.या घटनेनंतर दोन्ही गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दोडामार्ग पोलिस स्थानकात धाव घेतली. तर काही पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण, तसेच इतर पदाधिकारी यांना फोन करून घटनेची माहिती दिली.यावर काय तो तोडगा काढा
अशी मागणी केली.
दोडामार्ग येथे भाजपाच्या कार्यालयात निवडणूक संदर्भात उमेदवार निश्चित करणे बाबत चर्चा सुरू होती.यावेळी काही प्रभागात जागेवरून वादावादी झाली.काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले यावेळी काही पदाधिकारी यांनी सोडवले. हे प्रकरणं मिटवून एकनाथ नाडकर्णी आपल्या घरी जात असताना वाटेत अडवून हल्ला केला ते जीव वाचवण्यासाठी एका महिला पदाधिकारी यांच्या घरात धाव घेतली.
शैलेश दळवी यांनी एकनाथ नाडकर्णी, यांनी तसेच इतर साथीदार यांनी हल्ला केला असा आरोप केला आहे.
दोडामार्ग येथे दोन गटात हाणामारी बाचाबाची झाली .या नंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, संतोष नानचे, सुधीर दळवी,प्रकाश गवस, पांडुरंग बोर्डेकर,शानी बोर्डेकर,
अजित देसाई, संजय विरनोडकर, व इतर पदाधिकारी दोडामार्ग पोलिस स्थानकात दाखल झाले तर
भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रविण गवस, शैलेश दळवी, लक्ष्मण नाईक, चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर, संजय सातार्डेकर, समीर रेडकर, दिपक गवस, सुनिल गवस, देवेंद्र शेटकर, इतर पदाधिकारी उपस्थित होते.