*कोकण Express*
*जिल्हा बँक नूतन संचालक ऍड समीर सावंत यांचा भाजपा कळसुली विभागाच्या वतीने सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालकपदी निवडून आलेल्या नूतन बँक संचालक ऍड. समीर सावंत यांचा भाजपा कळसुली विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ऍड समीर सावंत यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज असलेले विरोधी गटातील विकास सावंत यांचा पराभव केला . या सत्कारावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जि प सदस्या सायली सावंत, उपतालुकाध्यक्ष शशी राणे, सचिन पारधीये, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, शाम दळवी,लवू परब, अभय गावकर, शिवा राणे उपस्थित होते.