*कोकण Express*
*सहकारात राजकारण नको,तर चांगल्या लोकांच्या हातातच जिल्हा बँक देवून आदर्श कायम ठेवा…*
*कोकणी माणूस हा विचार करुन मतदान करतो हा इतिहास ; अजित पवार..*
सहकारात पक्षीय राजकारण येवू देवू नका, तर चांगल्या लोकांच्या हातातच जिल्हा बँक देवून मागच्या लोकांनी घालून दिलेला आदर्शन कायम ठेवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. दरम्यान कोकणी माणूस हा विचार करुन मतदान करतो हा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती या निवडणूकीत करून चुकीच्या लोकांना बँकेपासून बाजूला ठेवा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा बँकेच्या मेळाव्यात ते बोलत होते.