*कोकण Express*
*शिवसैनिक रक्त देणारा आहे काढणारा नाही*
*किरण सामंत व विनायक राऊत यांच्या वादातून संतोष परब यांच्यावर हल्ला हा नितेश राणे यांचा जावई शोध*
*खास.विनायक राऊत यांची टीका…!*
*जिल्हा बँक महाविकास आघाडीच जिंकणार;खास.विनायक राऊत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढत आहोत,जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल.शिवसैनिक रक्त देणारा आहे काढणारा नाही.किरण सामंत व विनायक राऊत यांच्या वादातून संतोष परब यांच्यावर हल्ला हा नितेश राणे यांचा जावई शोध आहे. स्वतः करायचं आणि त्याचं खापर इतरांवर फोडायचं हा नितेश राणे यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलीस खऱ्या आरोपीला समोर आणतील त्यावेळी नितेश राणे यांचं उखळ पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकांमधील रक्तरंजित इतिहास हा राणे कुटूंबियांचाच असल्याचा आरोप शिवसेना खा.विनायक राऊत यांनी केला.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,तालुकाप्रमुख शैलेश भोगले,संदेश पटेल,संजय आंग्रे,राजू राठोड,राजू रावराणे,शांताराम रावराणे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
खास. विनायक राऊत म्हणाले,स्वाभिमान पुरस्कृत राडेबाज संस्कृती पुन्हा पुढे येत आहे.२०१४ पासून जिल्ह्यातील जनतेने बिमोड केला होता.आता ७ वर्षे थांबलेली विकृती डोके वर काढत आहे.शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर वार केलेले आहेत.त्याचा तपास पोलीस करत आहेत,या घटने मागे कोणाचा हात आहे,हे तपासात उघड होईल.मात्र ,नितेश राणे हे सातत्याने आमचा उल्लेख करताहेत,ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला खा.राऊत यांनी लगावला.
आम.दीपक केसरकर ,पालकमंत्री उदय सामंत, आम.वैभव नाईक व आम्ही एक विचाराने आम्ही काम करत आहोत. शिवसेनेत आम्ही एक आहोतच, महाविकास आघाडी एकत्र आहे. किरण सामंत व राऊत यांच्यात वाद असल्याचे दाखवून नितेश राणे दिशाभूल करत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी आम्ही एकत्र निवडणूक लढवली.चारही नगरपंचायतमध्ये आम्ही जिंकणार आहोत.हल्ला प्रकरणात राजकीय व्यक्तीचे हात आहेत,तेही कणकवली मधील आहेत असे खास. राऊत म्हणाले.
पोलिसांनी आम्ही विनंती केली,त्याच्या कामात आमचे हस्तक्षेप करत नाही. अजूनही काही आरोपी आहेत,मॉल मधील एक कर्मचारी आहे,त्याची गाडी जिल्ह्यात फिरत होती. त्या आरोपींची चौकशी झाली पाहिजे असे खा.राऊत यांनी सांगितले.स्वतःच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडायची, स्वतःच्या कार्यकर्त्यांना जिवानिशी मारायचं ही विकृती राणे यांच्या घराने निर्माण केली. ती शिवसेनेने केली नाही अशी घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. शिवसैनिक स्वताच्या कार्यकर्त्याचा रक्त कदापिही सांडत नाहीत. शिवसैनिक हा स्वतःच रक्त देऊन इतरांचे जीव वाचवतो. सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे या घटनांचा संदर्भ देत खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली. शिवसैनिकांमध्ये ही परंपरा येणारही नाही असेही श्री राऊत यांनी यावेळी सांगितले.
आम.नितेश राणे यांच्याबाबत बोलताना खास राऊत म्हणाले,म्याव म्याव करणं हा नितेश राणे यांनी कोकणच्या संस्कृतीचा अपमान केला,कोकणचा हा अपमान आहे, ही कोकणची परंपरा नाही.त्यामुळे लोकांनी त्याचे वागणं पाहिलं आहे.
खास .राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची आम्ही भेट घेतली, चांगल्या कामांसाठी आम्ही भेटलो.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.आम्ही बालिशपणा करत नाही.आवर्जून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी आहे. असे सांगताना ते म्हणाले,पेट्रोल व डिझेल कर कपात करायचे असेल तर ५६ हजार कोटी जीएसटीचेकेंद्राने दिले पाहिजेत, त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत.केंद्राकडून ६० हजार कोटी पेक्षा जास्त येणं आहे,ती दिल्यास बर होईल,असेही खा.राऊत म्हणाले.