*कोकण Express*
*राणेंच्या खाजगी बंगल्याच्या रस्त्यासाठी आवश्यक जमीन खरेदीसाठी शहरवासीयांचे 25 लाख खर्च करण्यास विरोध*
*नगरसेवक कन्हैया पारकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमचा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या खाजगी बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला अथवा रस्ता बनविण्याच्या कामाला अजिबात विरोध नाही. मात्र राणेंच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी अर्थात खरेदी करण्यासाठी कणकवली शहरवासीयांनी दिलेल्या टॅक्स मधून न. पं. च्या फंडातील 25 लाख रुपये खर्च करण्यास विरोध आहे. स्वतःच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे स्वतःच्या पैशांनी जमीन खरेदी करू शकत नाही काय ? राणेंच्या मालकीच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी कणकवली शहरवासीयांच्या मालकीचे 25 लाख का खर्च करता ? असा खडा सवाल शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर यांनी विचारला आहे. न. पं. बैठकीत आ. वैभव नाईक यांच्या घरामागील गटारासाठी 50 लाख मंजूर झाल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. त्या गटाराचा फायदा केवळ आ. वैभव नाईक यांनाच एकट्याला होणार नसून कणकवली शहरातील सांडपाण्याचा निचरा या गटारातून होणार असल्याचेही नगरसेवक पारकर म्हणाले.