राष्ट्रवादीच्या कार्यालयास आप्पा पराडकरांची सदिच्छा भेट

राष्ट्रवादीच्या कार्यालयास आप्पा पराडकरांची सदिच्छा भेट

*कोकण Express*

*राष्ट्रवादीच्या कार्यालयास आप्पा पराडकरांची सदिच्छा भेट…!*

*रुपेश जाधव, निखिल गोवेकर यांनी श्री.पराडकर यांचा केला सत्कार…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे कामगार नेते आप्पा पराडकर यांनी राष्ट्रवादीच्या कणकवली कार्यालयाला गुरुवारी भेट दिली. या भेटी दरम्यान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चर्चा करत त्यांची विचारपूसही केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव व निखिल गोवेकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
यावेळी श्री.पराडकर यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये देखील होते.याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य नीलेश गोवेकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष राजेश पाताडे,निखिल गोवेकर, समीर आचरेकर, संदेश मयेकर, नयन गावडे, अजय जाधव, सागर वारंग, अमित पुजारे, विजय खरात, आतिष कांदळगावकर, रवी पुजारे आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही मदत लागल्यास आपणास निसंकोचपणे सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!