*कोकण Express*
*वैभववाडी तालुका सुतार शिल्पकार समाज बांधवांची 23/ 12/ 2021 रोजी होणार सभा*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुका सुतार शिल्पकार समाज बांधवांची सभा उद्या दिनांक 23/ 12/ 2021 रोजी सकाळी दहा वाजता अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सुतार शिल्पकार समाज अध्यक्ष आनंद मेस्त्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व सुतार समाज बांधवांनी उद्या या सभेसाठी उपस्थित राहावे, अशी विनंती वैभववाडी तालुक्यातील सुतार समाजाचे ज्येष्ठ डिके सुतार यांनी आवाहन केले आहे.