*कोकण Express*
*राजकीय आरोपांची उत्तरे ३० डिसेंबरनंतर:आम.नितेश राणे*
*सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा विजय होणार; कर्मचाऱ्यांना पर्मनंट करणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा बँकेत परिवर्तन होणे आवश्यक आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल.देशाचे सहकार मंत्री अमित शहा आहेत,त्याचा फायदा बँकेला व नागरिकांना करण्यासाठी आम्ही आहोत. जिल्हा बँकेने रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेऊन आम्हीच परमनंट करू शकतो.आम्हाला आमचे नेते ना.नारायण राणे यांची आचारसंहिता आहे.त्यामुळे राजकीय आरोपांची उत्तरे ३० डिसेंबरनंतर दिले जाईल असा इशारा भाजपा आ.नितेश राणे यांनी दिला आहे. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष,पॅनेल प्रमुख राजन तेली,बँक उमेदवार अतुल काळसेकर,महेश सारंग,मनीष दळवी,प्रज्ञा ढवण, गुलाबराव चव्हाण, गुरुनाथ पेडणेकर, विठ्ठल देसाई,गजानन गावडे,कमलाकांत कुबल,दिलीप रावराणे,समीर सावंत,प्रकाश बोडस,प्रकाश गवस,बाबा परब,सुरेश चौकेकर,रवींद्र मडगावकर ,अस्मिता बांदेकर आदी भाजपा पुरस्कृत जिल्हा बँक उमेदवार उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक आहे,कठलेही राजकारण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत नाही.सहकार रुजला पाहिजे, त्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे.कुणीही कितीही टीका टिप्पणी केली तरी आम्ही बोलणार नाहीत.
शेती,विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत.सिद्धिविनायक सहकार पॅनेलचे प्रमुख राजन तेली असतील.आता हा राजकीय वादाचा मुद्दा असणार नाही.असंख्य लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत,त्यांना पर्मनंट करण्याचा शब्द मी देतो,राणेंच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावणार आहोत.तरुण तरुणींची फसवणूक केली जात आहे.सगळ्या लोकांना कायम केले जाईल.मतदार असलेल्या लोकांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या गेल्या असल्याचा आरोप आ.नितेश राणे यांनी केला. आमच्या पॅनेलला बाळासाहेब अनास्कर यांचे मार्गदर्शन आहे.प्रतिभा डेअरी बाबत तेच उत्तर देतील,जो काही मुद्दा आहे तो न्यायालयात आहे.त्यामुळे मी काही त्यांचा प्रवक्ता नाही,असेही नितेश राणे यांनी सांगितले. राजन तेली म्हणाले, जिल्हा बँक सिद्धिविनायक सहकार पॅनेल ना.नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत,कपबशी हे चिन्ह आम्हाला मिळले आहे.जिल्हा बँकेची प्रगती ही विकासाची कामे,व्यवहार वाढला हे यश राणेंमुळे मिळाले आहे.सहकार मधील सुरुवात शिवराम भाऊ जाधव व ढोलम यांनी केली.त्याच आधारावर आम्ही काम करणार आहोत,केंद्रात ना.राणे मंत्री आहेत,जिल्ह्यात उद्योग निर्माण झाले पाहिजेत,त्यासाठी केंद्रीय अधिकारी २१,२२,२३ जानेवारीत सर्व ऑफिस जिल्ह्यात येत आहे.कुणीही कितीही टीका केली तरी आमचे पॅनेल विजयी होणार आहेत.१९ ही जागा आम्ही जिंकणार आहोत,आता ९८१ मतदार आहेत,घाणेरडे राजकारण सतीश सावंत यांनी केले,खात्यात पैसे असताना त्या संस्था बाद केल्या आहेत,अशीही टीका केली. सहकार पॅनेल विविध लोकांना आम्ही सोबत घेऊन काम करत आहोत.रोजगार वाढविण्यासाठी आम्ही काम करणार आहोत,संपूर्ण जिल्ह्यात अनेक कार्यालये या ठिकाणी होत आहे.ना.राणे व ना.शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक आहे,त्यामुळे मतदारांनी आमच्या उमेदवाराना निवडुन द्यावे,तळागाळातील सर्व घटकांना समोर ठेवून राणेंच्या मंत्रिपदाचा उपयोग करून घेता येतील.पूरक व्यवसाय निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे,असेही राजन तेली यांनी सांगितले. २००८ साली जिल्हा बँकेत नारायण राणे नेतृत्वाखाली पॅनेल बसले.नारायण राणे यांच्यामुळे बँकेने प्रगती केली आहे,असे बँक संचालक अतुल काळसेकर यांनी सांगितले. आमच्या पॅनलने जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे अतुल काळसेकर म्हणाले.