*कोकण Express*
*दोडामार्ग मध्ये १३ प्रभागासाठी ८१.८६ टक्के मतदान…*
कसई दोडामार्ग नगरपंचायत तेरा प्रभागासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणूक सरासरी८१.८६ टक्के एवढे मतदान झाले अशी माहिती निवडणूक अधिकारी वर्षा शिंगण सहाय्यक निवडणूक अधिकारी शिवराज गायकवाड यांनी दिली आहे.यावेळी तहसिलदार अरुण खानोलकर देखील उपस्थित होते.२१५१ पैकी १७६१ जणांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे तेरा प्रभागातील ३६ उमेदवारांचे भवितव्य आज मशिन मध्ये बंद झाले.
सर्व प्रभागात मतदान शांततेत पार पडले असले तरी काही प्रभागात चूरशीची लढत झाली आहे.प्रभाग २ प्रभाग ३ प्रभाग ५ प्रभाग ६ प्रभाग ७प्रभाग ९ प्रभाग ११ प्रभाग १५ प्रभाग १७ मध्ये मोठी टक्कर होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी मोजक्या मतांनी उमेदवार निवडून येतील हे मात्र निश्चित आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक करीता मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूक वेळी झालेल्या मतदानापेक्षा या वेळी मतदान वाढले असून,युवा वर्गाचा कौल निर्णायक ठरणार आहे. यावेळी झालेल्या मतदानात प्रभाग २ मध्ये १५० पैकी १२६ जणांनी मतदान केले,प्रभाग ३ -१५१ पैकी १२० जणांनी मतदान केले. प्रभाग ५ – १६३ पैकी १२७ जणांनी मतदान केले. प्रभाग -६ मध्ये २३१ पैकी १८९ जणांनी मतदान केले.प्रभाग ७ १८९ पैकी १६८ जणांनी मतदान केले. प्रभाग ९ मध्ये २०५पैकी १६४ जणांनी मतदान केले.प्रभाग ११ मध्ये १२४ पैकी १०१ जणांनी मतदान केले.प्रभाग -१२ मध्ये १२४ पैकी ११५ जणांनी मतदान केले. प्रभाग १४ – १८० पैकी १४९ जणांनी मतदान केले.प्रभाग १५ – १९९ पैकी १४८ जणांनी मतदान केले.प्रभाग १६ – १३८ पैकी ११३ जणांनी मतदान केले. तर प्रभाग -१७ १२६ पैकी १०४ जणांनी मतदान केले.