*कोकण Express*
*वेंगुर्ला तालुक्यात पोटनिवडणूकीसाठी एकूण ४६.१२ टक्के मतदान*
वेंगुर्ला तालुक्यात मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत उभादांडा, खानोली, दाभोली या ३ ग्रामपंचायतीच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी एकूण ४६.१२ टक्के एवढे मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
उभादांडा येथे दोन मतदान केंद्रावर मिळून १३३१ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ३४.९३ टक्के एवढे मतदान झाले. येथे संजय चव्हाण यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. दाभोलीत ५०० मतदारांपैकी ३२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ६५ टक्के मतदान झाले. येथे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून विजय घोंगे यांनी काम पाहिले. खानोली येथे २४२ मतदारांपैकी १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ६८.५९ टक्के मतदान झाले. येथे प्रितम पवार यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. उभादांडा मधून कमलाकर पांडूरंग कुबल, गणपत उपमन्यु सावंत रिगणात, खानोलीत रुपाली किरण प्रभूखानोलकर व रघुनाथ लक्ष्मण खानोलकर हे रिगणात व दाभोली ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी एकनाथ रामचंद्र राऊळ व राजाराम यशवंत कांबळी रिगणात होते. बुधवार २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसिलदार कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे.